सोयाबीन तननाशक ; सोयाबीनसाठी टॉप 3 प्रभावी तणनाशके

सोयाबीन तननाशक ; सोयाबीनसाठी टॉप 3 प्रभावी तणनाशके

शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये तणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य तणनाशकाची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. या लेखात आपण सोयाबीनसाठी टॉप 3 प्रभावी तणनाशके, त्यांचा वापर, प्रमाण आणि फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तरपणे पाहूया, जेणेकरून तुम्हाला १००% चांगले रिझल्ट मिळतील.

सोयाबीन तननाशक ; सोयाबीनसाठी टॉप 3 प्रभावी तणनाशके

■ अदामा चे शकेद (Adama Shaked)
अडमा शकेद हे सोयाबीन पिकातील तणांसाठी एक अतिशय प्रभावी तणनाशक आहे. हे विशेषतः गवतवर्गीय (लांब पाने) आणि रुंद पानांच्या दोन्ही प्रकारच्या तणांवर नियंत्रण मिळवते.यामध्ये प्रोपॅक्विझाफॉप 2.5% आणि इमाझेथापीर 3.75% हे घटक आहेत. शकेदमध्ये दोन घटक असल्याने ते तणांवर दुहेरी पद्धतीने काम करते.

प्रति 15 लिटर पंपासाठी 80 मिली आणि प्रति एकरसाठी 800 मिली याचे वापरन्याचे प्रमाण आहे.

■ BASF ओडिसी (Odyssey)

BASF चे ओडिसी हे देखील एक प्रभावी तणनाशक आहे, जे प्रामुख्याने सोयाबीन, भुईमूग, तूर यांसारख्या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरले जाते. ओडिसी गवतवर्गीय (लांब पाने) आणि रुंद पानांच्या दोन्ही प्रकारच्या तणांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवते.यामध्ये इमाझेथापिर (Imazethapyr) 35% आणि इमाझामॉक्स (Imazamox) 35% हे घटक असतात.

प्रति एकरसाठी 40 ग्रॅम ओडिसी, जे 300 मिली एक्टिवेटरमध्ये मिसळून घ्यावे लागते..

■ सिंजेंटा फ्युजीफ्लेक्स (Syngenta Fusiflex)

सिंजेंटा फ्युजीफ्लेक्स हे देखील सोयाबीनसाठी उपयुक्त तणनाशक आहे.यामध्ये fluazifop-p-butyl 11.1% w/w आणि Fomesafen 11.1% w/w SL हे घटक असतात. हे तणनाशक रुंद आणि गवतवर्गीय दोन्ही प्रकारच्या तणांवर नियंत्रण मिळवते.

प्रति पंप 40 मिली फ्युजीफ्लेक्स आणि प्रति एकरसाठी 400 मिली एवढा याचा डोज आहे.

सोयाबीन तणनाशक फवारणीची योग्य वेळ

सोयाबीन पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी फवारणी करावी,यावेळी तण 2 ते 4 पानांचे आसते आणि तण लहान असताना फवारल्यास चांगले रिझल्ट मिळतात.

फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे महत्त्वाचे आहे.
तणनाशक फवारताना योग्य प्रमाण वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात वापरल्यास सोयाबीन पिकाला झटका बसू शकतो.

फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी, जेव्हा वारा कमी असतो, तेव्हा करावी. यामुळे तणनाशक इतर ठिकाणी उडून नुकसान होनार नाही

फवारणी करताना स्वच्छ पाणी वापरावे.

गवत 2-4 पानांवर असताना फवारणी केल्यास चांगले रिझल्ट मिळतात. जर गवत जास्त मोठे असेल, तर ते पूर्णपणे मरत नाही आणि पुन्हा हिरवे होते.

या टिप्सचा वापर करून तुम्ही सोयाबीनमध्ये तणांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवू शकता आणि चांगले उत्पादन घेऊ शकता.

Leave a Comment