आजचा हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात पाऊस, तर एवढे दिवस पाऊस घेनार रजा

आजचा हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात पाऊस, तर एवढे दिवस पाऊस घेनार रजा

राज्यात पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाची उघडीप राहील,फक्त तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आज १३ जूलै रोजी राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे,तसेच तुमच्या जिल्ह्यात हवामान कसे राहील पाहुयात सविस्तर…

रामचंद्र साबळे हवामान अंदाज – येथे पहा 

आजचा हवामान अंदाज ; 13 july 

 

विदर्भ ; विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज पावसाची उघडीप राहील, तुरळकच एखाददोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे..

मराठवाडा ; मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात आज पावसाची उघडीप राहील. जालना आणि छ.संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. तसेच ईतर जिल्ह्यातही तुरळकच ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे..

मध्य महाराष्ट्र/उत्तर महाराष्ट्र/दक्षिण महाराष्ट्र ; नाशिकचा पश्चिम भाग, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आसून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर, सांगली हवामान कोरडे राहील तर जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळकच ठिकाणी हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

कोकण ; कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे तर उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडन्याची शक्यता आहे.

आजचा हवामान अंदाज

पुढील 5-6 दिवस राज्यातील हवामान असेच राहील, फक्त तुरळक ठिकाणीच हलका पाऊस होईल मोठ्या पावसाची शक्यता नाही अशी माहिती के.एस होसाळीकर यांनी दिली आहे.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पाऊस घेनार विश्रांती, या तारखेपासून जोरदार पाऊस

Leave a Comment