कापूस तननाशक/कापूस पिकासाठी तननाशक ; kapus tananashak

कापूस तननाशक/कापूस पिकासाठी तननाशक ; kapus tananashak

महाराष्ट्रामध्ये कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात. कापसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य आंतर, खत व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रण महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर, तण नियंत्रण हे देखील तितकेच आवश्यक आहे.

पूर्वी तण नियंत्रणासाठी बैलपाळ्या मारल्या जात असत किंवा खुरपणी केली जात असे. परंतु अनेकदा मजूर वेळेवर मिळत नाहीत, शेतात वापसा नसतो किंवा इतर कारणांमुळे तण नियंत्रण शक्य होत नाही. अशा वेळी शेतकरी तणनाशकांचा वापर करू शकतात.

कापूस पिकासाठी योग्य तणनाशक निवडणे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. या लेखात आपण कापूस पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे, त्याचे प्रमाण किती असावे, कोणती तणे नियंत्रणात येतील आणि फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

कापूस तननाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी

तणनाशकाची फवारणी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि पिकाला कोणताही धोका पोहोचणार नाही:

जमीन ओली असावी: फवारणी करताना जमीन ओली असणे आवश्यक आहे. कोरड्या जमिनीवर फवारणी केल्यास चांगले परिणाम मिळत नाहीत.

तणनाशकाचे प्रमाण कमी-जास्त करू नका. प्रमाण कमी झाल्यास परिणाम कमी मिळतील आणि जास्त झाल्यास पिकावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कापूस पीक 21 दिवसांचे झालेले असावे.

तणे लहान, म्हणजे 3-4 पानांवर असताना फवारणी करणे अधिक प्रभावी ठरते.

कडक उन्हात फवारणी करू नये. पहाटे किंवा दुपारनंतर (ऊन कमी झाल्यावर) फवारणी करणे योग्य आहे.

जर तुम्ही राउंडअप (Roundup) सारखे तणनाशक फवारण्यासाठी वापरलेला पंप पुन्हा वापरणार असाल, तर तो पूर्णपणे स्वच्छ धुवूनच वापरावा.

तणनाशकासोबत कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा विद्राव्य खते मिसळू नका.

कपाशीला फुले लागल्यानंतर या तणनाशकाचा वापर करू नये.

 

kapus tananashak ; कोणते तणनाशक वापरावे?

कापूस पिकासाठी प्रभावी तणनाशके बाजारात उपलब्ध आहेत ज्यांमध्ये पायरीथायोबॅक सोडियम 6% + क्विझालोफॉप इथिल 4% (Pyrithiobac sodium 6% + Quizalofop ethyl 4%) हे घटक असतात. हे घटक असलेली काही प्रमुख कंपन्यांची तणनाशके खालीलप्रमाणे आहेत:

गोदरेज कंपनीचे हिटविड मॅक्स (Hitweed Max) – खरेदी करा 

बायर कंपनीचे GHASA (घासा) – खरेदी करा 

धानुका कंपनीचे DOZO MAXX (डोजो मॅक्स) – खरेदी करा 

टाटा च केवट अल्ट्रा kevat ultraखरेदी करा 

मास्टर स्ट्रोक master strokeखरेदी करा 

यापैकी कोणतेही एक तणनाशक तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता.

kapus tananashak : प्रमाण किती घ्यावे?

एका एकरासाठी: 200 लिटर पाण्यामध्ये 450 मिली औषध मिसळून फवारणी करावी.

प्रती पंपासाठी: साधारणपणे 20 लिटरच्या पंपाला 45 मिली औषध घ्यावे.

हि काळजी घ्या..👇

औषधाची मात्रा कमी-जास्त करू नका.

कपाशीला फुले लागल्यानंतर याचा वापर करू नका.

कापूस पीक 20 ते 30 दिवसांचे असताना फवारणी केल्यास उत्तम परिणाम मिळतील.

हे तणनाशक कापूस पिकातील रुंद पानांची तणे लांब पानचे तन नियंत्रणात आणण्यास मदत करते.

शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. तणनाशकाचा वापर योग्य पद्धतीने करून तुम्ही तुमच्या कापूस पिकाचे उत्पादन वाढवू शकता.

कापूस तननाशक येथून खरेदी करा

Leave a Comment