पंजाब डख अंदाज ; पुढचे 5 दिवस राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस, पहा सविस्तर

पंजाब डख अंदाज ; पुढचे 5 दिवस राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस, पहा सविस्तर

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 17 ते 21 जुलैदरम्यान काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी पिकांना जिवदान मिळेल असा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.

पंजाबराव डख यांचा 16 जुलै रोजीचा अंदाज अगदी खरा ठरला आहे. त्यांनी सांगितलं होतं की, जिथे आभाळ तांबडं दिसेल, तिथे पुढील 72 तासांत चांगला पाऊस होईल. त्यानुसार, जालना, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव आणि राज्याच्या इतर काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला, काही ठिकाणी तर नद्यांना पूरही आल्याचं पहायला मिळालं

पंजाब डख अंदाज – १७ ते २१ जूलै कोणत्या जिल्ह्यांत पडणार जोरदार पाऊस?

या काळात, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर आणि अहमदनगरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही 17 ते 21 जुलै दरम्यान चांगला पाऊस होईल, असा पंजाबराव डख यांचा अंदाज आहे.

ज्या भागांमध्ये अजूनही चांगला पाऊस झालेला नाही, तिथे 17, 18, 19, 20 आणि 21 जुलै रोजी चांगला पाऊस पडेल आणि पिकांना जिवदान मिळेल, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

Leave a Comment