पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपर्यंत मोठा पाऊस नाही, या तारखेनंतर मूसलळधार

पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपर्यंत मोठा पाऊस नाही, या तारखेनंतर मूसलळधार

राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग तसेच विदर्भाच्या काही भागात मागच्या बर्याच दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. चांगला पाऊस कधी येईल याची शेतकरी अतुरतेने वाट बघत आहे… तर हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी चांगल्या पावसाला सुरुवात कधी होईल आणि पुढील काही दिवस कुठे पाऊस पडेल याबाबत अंदाज जाहीर केला आहे… तो आपन सविस्तर पाहू👇

आज आणि उद्या (१४-१५ जुलै) रोजी परभणी, लातूर, बीड, धाराशिव, अहमदनगर, जालना, संभाजीनगर , आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर नसेल, पण काही ठिकाणी पिकांसाठी तो जिवदान ठरनार आहे. दुपारपर्यंत ऊन आणि दुपारी ३ नंतर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.

तुमच्या गावाची घरकुल यादी – येथे पहा 

१८ जुलै नंतर नांदेड, लातूर, अक्कलकोट, सोलापूर, उदगीर, निलंगा, धर्माबाद, बिलोली, नायगाव, जळकोट या भागांमध्ये चांगला पाऊस होनार आहे कारण तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथे पाऊस पडनार असल्याने महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्येही त्याचा परिणाम दिसून येईल, असं पंजाब डख यांनी सांगितलं आहे.

 

पंजाब डख हवामान अंदाज या तारखेनंतर राज्यात मोठा पाऊस

 

२२ जुलै नंतर हवामान हळूहळू सुधारून पावसाची शक्यता वाढेल. पण, २७, २८, २९ जुलै या तारखांना राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस होईल. या पावसामुळे ओढे-नाले भरून वाहतील, असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

२० जुलैपर्यंत राज्यात मोठा पाऊस नाही. तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल. पण, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र राज्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसात ओढे आणि नाले वाहून निघतील, इतका पाऊस सगळीकडे होईल, अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

Leave a Comment