रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; आँगष्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहील ?
ज्येष्ठ कृषी हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार, यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
सध्या हवेचे दाब अनुकूल असल्याने चांगल्या पावसाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही चांगले पाऊस होतील अशी आशा डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.
रामचंद्र साबळे यांनी जूनच्या सुरुवातीलाचा एक अंदाज दिला होता त्यामध्ये जून आणि जूलै महिन्यात पावसात मोठे खंड पडतील आशी माहिती त्यांनी दिली होती. रामचंद्र साबळे यांनी दिलेला जून आणि जूलै महिन्याचा अंदाज खरा ठरला आहे.
आता आँगष्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडन्याची शक्यता रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कमी पाऊस झालेल्या भागांत दिलासा मिळेल अशी आशा आहे.