रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कधी, पहा सविस्तर
रामचंद्र साबळे यांनी राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस कधी होईल याबाबत अंदाज जाहीर केला आहे. रामचंद्र साबळे यांनी दिलेला अंदाज या लेखात आपण सविस्तर पाहनार आहोत…
या आठवड्यात महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन १००४ ते १००६ हेप्टापास्कल एवढा अधीक हवेचा दाब राहनार आसल्यामुळे बहुतांश भागात पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज साबळे यांनी व्यक्त केला आहे.
या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात बराच काळ पावसाची उघडीप आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहील असे साबळे यांनी सांगितले.
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; चांगल्या पावसाला सुरुवात कधी ?
राज्यातील बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. या भागात जूलैच्या शेवटच्या आठवड्यात तसेच आँगष्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस बरसनार आहे अशी माहिती साबळे यांनी दिली आहे.
हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 30° सेल्सिअस तर प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १६℃ तर ईक्वाडोरजवळ २५℃ राहील आणि यामुळे चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल असे साबळे यांनी आपल्या अंदाजात सांगितले.
आँगष्ट सप्टेंबर, पाऊस जोर धरनार
राज्यात जूलैच्या शेवटच्या आठवड्यात तसेच आँगष्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस जोर धरनार आसून कमी पाऊस झालेल्या भागात या पावसामुळे दिलासा मिळेल. – साबळे