हवामान अंदाज today ; पाऊस घेनार विश्रांती, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज, लगेच पहा
आज राज्यात कुठे पावसाचा अलर्ट आहे, महाराष्ट्रात पुढील 5 दिवस हवामान कसे राहील, कोनत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तर कुठे पाऊस विश्रांती घेनार आहे याबद्दल हवामान खात्याने दिलेला हवामानाचा अंदाज आपण या पोष्टमधून सविस्तर पाहुयात..।
हवामान अंदाज today आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?
पूर्व विदर्भ: नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा: जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र: या भागातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे जिल्हा: पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील इतर जिल्हे: उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोणताही विशेष अलर्ट नसून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज
पुढील ५ दिवसांसाठी, राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
विदर्भ आणि कोकण या भागांमधील जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस तुरळकच ठिकाणी हलका पाऊस होईल राज्यातील इतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
थोडक्यात, पुढील काही दिवसांत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसुन बहुतांश ठिकाणी पावसाची विश्रांती आणि काही ठिकाणीच तुरळक सरी बरसतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.