15 जूलै हवामान अंदाज ; राज्यातील या भागात मुसळधार तर ईथे पावसाची विश्रांती…
आज पुढील काही तासात कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केलाय..तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे..
15 जूलै हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात पावसाचा अंदाज
मराठवाडा ; नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, बिड, जालना, छ.संभाजीनगर या जिल्ह्यात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे…
विदर्भ ; विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज कोणत्याही प्रकारचा अलर्ट नाही, त्यामुळे आज विदर्भात पावसाची विश्रांती राहील आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय.
रामचंद्र साबळे हवामान अंदाज – येथे पहा
उत्तर महाराष्ट्र ; धुळे नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तळ जळगाव, नाशिक या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मध्य/दक्षिण महाराष्ट्र ; पुणे, सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस होईल..
कोकण : कोकणातील सर्वच जिल्ह्यात आज मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.