Havaman andaj ; पुढील 4 आठवडे पाऊस कसा ? पहा तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा
देशासह राज्यात पुढील ४ आठवडे (०७ आँगष्टपर्यंत) पाऊस कसा राहील याबाबत हवामान खात्याने दिलेला अंदाज या लेखात सविस्तर पाहू…
■ सरासरीपेक्षा कमी पाऊस म्हनजे खंड नसतो..
■ गुलाबी रंग सरासरीपेक्षा कमी पाऊस दाखवतो..
■ पांढरा रंग सरासरीएवढा पाऊस दाखवतो..
■ निळसर रंग सरासरीपेक्षा जास्त पाऊस दाखवतो..
■ पहिल्या आठवड्याचा अंदाज अचूक आसतो,त्यानंतर अचूकता कमी होत जाते
Havaman andaj ; पुढील 4 आठवडे पाऊस कसा ?
पहिला आठवडा (१० ते १७ जूलै)
महाराष्ट्रातच्या उत्तर भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील दक्षिण भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे….
दुसरा आठवडा (१७ ते २४ जूलै)
या आठवड्यात संपूर्ण विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्याचा पुर्व भाग आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीएवढा पाऊस पडेल..
पुणे अहिल्यानगरसह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय..
तीसरा आठवडा (२४ ते ३१ जूलै)
संपूर्ण मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात दक्षिण भागात सरासरीएवढा तर उत्तरेकडील जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडन्याची शक्यता आहे.
सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगावच्या बहुतांश भागात सरासरीएवढा तर उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
चौथा आठवडा (३१ जूलै ते ०७ आँगष्ट)
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यात सरासरीएवढा पाऊस पडेल.
उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा बहुतांश भाग आणि कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे..