25 जूलै हवामान अंदाज ; राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा, हे जिल्हे

25 जूलै हवामान अंदाज ; राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा, हे जिल्हे

पुढील काही तासात राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यात हा पाऊस हजेरी लावनार आहे.

आज कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट जारी करण्यात आलाय,कुठे मुसळधार तर कुठे अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे सविस्तर पाहूयात..

महसूल मंत्र्यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, पहा काय फायदा होनार

25 जूलै हवामान अंदाज ; राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार 

 

विदर्भ ; भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातही मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.. अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसाचा यल्लो अलर्ट तर बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय..

 

मराठवाडा ; जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड मध्यम ते जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट तर संभाजीनगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
बिड,लातूर, धाराशिव हलक्या पावसाचा अंदाज (imd)

 

पीएम किसान चा 20 वा हप्ता जमा होणार..तारीख फिक्स

 

मध्य महाराष्ट्र (उत्तर/मध्य/दक्षिण) ; नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात मुसळधार तर धुळे नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो आलर्ट देण्यात आला आहे.
पुणेच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार तर सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

कोकण ; कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर,मुंबई या सर्व जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

25 जूलै हवामान अंदाज

Nuksan bharpai मंजूर GR आला, या जिल्ह्यांसाठी एवढा निधी 

Leave a Comment