Payment Status ; पिकविमा, अनुदान, नुकसानभरपाई कोनत्या खात्यात जमा झाली, चेक करा
नमस्कार मित्रांनो, शासनाकडून मिळणारं कोणतंही अनुदान, मग ते अतिवृष्टी अनुदान असो, रेशनचे पैसे असो, पीक विमा असो किंवा इतर कोणत्याही योजनेचं अनुदान असो, ते आपल्या कोणत्या बँक खात्यात जमा होतं आणि ते ऑनलाइन कसं तपासायचं, याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
त्यासाठी, सर्वात आधी तुम्हाला हे तपासावं लागेल की आपलं आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे.
त्यासाठी तुम्हाला एनपीसीआय (NPCI) पोर्टलवर यायचं आहे.
इथे तुम्हाला कंझुमर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर भारत आधार सीडिंग स्टेटस (Bharat Aadhaar Seeding Status) निवडा.
त्यानंतर अकाउंट डिटेल्स(Account Details) वर क्लिक करा.
इथे तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल तो टाकून तुम्ही तुमच्या आधार कोणत्या बँक खात्याला लिंक आहे याची माहिती मिळवू शकता.
Payment Status – अनुदान जमा झाले का असे पहा👇👇
आता आपण पाहूया की आपल्या खात्यात अनुदान जमा झालं आहे की नाही हे कसं तपासायचं.त्यासाठी तुम्हाला पीएफएमएस (PFMS) पोर्टलवर यायचं आहे. इथे नो युवर पेमेंट (Know Your Payment) या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या बँकेचं नाव निवडा.दोन वेळा तुमचा अकाउंट नंबर आणि कॅप्चा कोड टाका. तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून तुम्ही तुमच्या पेमेंटचं स्टेटस तपासू शकता.
यामध्ये तुम्हाला रेशनचे पैसे, पीक विम्याची रक्कम आणि इतर जमा झालेल्या अनुदानाची माहिती तारीख आणि रकमेसह पाहता येईल.
या सोप्या ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिक त्यांच्या खात्यात जमा झालेले किंवा जमा होणारे अनुदान सहज तपासू शकतात.