havaman andaj ; शुक्रवार 11 जूलैपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
गेल्या तीन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश आणि पूर्व विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, मात्र शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी होऊन राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आपल्या सर्वसाधारण जागेवर आसून दक्षिण गुजरात आणि शेजारच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत.पश्चिम बंगालचा दक्षिण भाग आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र आहे, जे पुढील दोन दिवसांत झारखंड आणि उत्तर छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य भारत आणि उत्तर भारतात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
आजचा (मंगळवार) 8 जूलैला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट (जोरदार ते अतिजोरदार पाऊस) देण्यात आला आहे.
अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत, खानदेशातील जळगाव, धुळे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत, तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.
havaman andaj 9 जूलै
उद्या 9 जूलैला कोकणातील सर्व जिल्हे, खानदेशातील तीन जिल्हे आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
शुक्रवार 11 जूलैपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.शुक्रवारी आणि शनिवारी मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आसून इतर भागांत पावसाची उघडीप राहन्याची शक्यता आहे.