Ladki bahin ; योजनेतून अनेक महिलांना वगळले, तुम्ही पात्र आहात का?
लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले असून, अनेक महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्याचा निर्णय घेन्यात आला आहे. सरकारने आता अपात्र महिलांचे हप्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे जाणून घेणं तुम्हाला आवश्यक आहे.
Ladki bahin या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
◆ तुमच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर..
◆ कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल किंवा नियमितपणे आयकर रिटर्न (ITR) दाखल करत असेल तर…
◆ कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील किंवा निवृत्तीवेतन (पेन्शन) घेत असतील तर
(खाजगी क्षेत्रात अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले कर्मचारी पात्र असतील)
◆ तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून दरमहा दीड हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा लाभ घेत असाल तर (उदा. संजय गांधी निराधार योजना)
◆ पीएम किसान योजनेचे लाभार्थी पात्र असतील, कारण त्यांना मिळणारी रक्कम कमी असते. मात्र त्यांना दरमहा 500 रूपये मिळतील.
◆ कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असतील, किंवा सरकारचे बोर्ड/कॉर्पोरेशनचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/सदस्य असतील तर
◆ तुमच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल तर…(ट्रॅक्टर सोडून).
या नवीन नियमांमुळे अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे आणि अजूनही तपासणी करून वगळण्यात येत आहे. जर तुम्ही या निकषांमध्ये बसत नसाल आणि तुम्हाला अजूनही हप्ता मिळत असेल, तर तुमचा हप्ता कधीही बंद होऊ शकतो.
पुढील 4 आठवडे पाऊस कसा – येथे पहा
https://agrogyanstudio.com/havaman-andaj-to/