Pm किसान चा हप्ता जमा होनार, अखेर प्रतीक्षा संपली
Pm किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या लाभार्थींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पिएम किसानचा २० वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. सरकारकडून किंवा पोर्टलवर याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै, २०२५ रोजी २० वा हप्ता जारी करू शकतात.
पंतप्रधान १८ जुलै, २०२५ रोजी मोतिहारी, बिहार येथे येणार असून, त्यांच्या या कार्यक्रमादरम्यान ते PM-KISAN चा निधी वितरित करण्याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.१९ व्या हप्त्याचे वितरण होऊन चार महिने झाले आहेत. आता लवकरच २० वा हप्ता खात्यात जमा होन्याची शक्यता आहे.
हप्ता हस्तांतरित होण्यापूर्वी, लाभार्थ्यांनी काही आवश्यक कामे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळायला आडचन येनार नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की २० वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील गोष्टी वेळेवर पूर्ण करणे आवश्यक आहे.
1) तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करा….
2) तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला असल्याची खात्री करा….
3) तुमच्या जमिनीच्या सीडिंग स्थितीची पडताळणी करा….
या महत्त्वाच्या पायऱ्या पूर्ण केल्यास, हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात कोणतीही अडचण न येता जमा होईल…